Posts

Showing posts from June, 2018

गुलमोहर

          गुलमोहर म्हणजे निसर्गाचा एक आविष्कारच... नाही का? केशरी रंगांची त्याने केलेली उधळण पहिली की मन भरुन जातं. आणि निसर्गाच्या किमयेचं अप्रुप वाटत राहतं. त्याच्या छटांवरून नजरच हटत नाही. मार्च ते मे दरम्यान सगळीकडे झाडे वाळून जातात तेव्हा हा डौलाने बहरतो आणि इतरांची उणीव भरून काढतो. येणाऱ्या जाणाऱ्या वाटाड्यांना सावली देऊन, विसावा देऊन त्यांना आपलंसं करतो. एक प्रकारे आपल्या गरजेच्या वेळी नकळत आपला आधारच होऊन जातो. बरेच जण बऱ्याचदा गुलमोहराविषयी लिहितात, रेखाटतात... त्याच्या छटा लेखणीतून, कुंचल्यातून जगासमोर पसरतात! तरीही परत परत लिहावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं त्याविषयी; प्रत्येक वेळी तो नव्याने दिसतो आणि उमगतो देखील!            पण याच गुलमोहराकडे आज एका नव्या दृष्टीने बघायचं का आपण? जगभरामध्ये कितीतरी कला आपण पाहतो. त्यातल्याच काही आपल्यातही लपलेल्या असतात. त्या इतरवेळी कधीच दिसून येत नाहीत पण आयुष्याच्या रखरखत्या उन्हांत त्या आपल्या रंगांची उत्स्फूर्तपणे उधळण करतात व गरजेच्या वेळी आपला आधार बनतात. प्रत्येक क्षणाला 'आनंदी उद्याची' चाहूल देत आपल्या मनात आशेचे, उमेदीचे अनो