Posts

Showing posts from July, 2018

गुरू

          पावसाळा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो हिरवागार निसर्ग! चैत्रात फुटलेली पालवी बहरते आणि सगळीकडे चैतन्य पसरतं. डोंगरदऱ्या, शेत, रस्ते सगळीकडे हिरवळ दिसू लागते. झाडाझुडुपांची ऊन-पाऊस मिळवण्यासाठी चढाओढ सुरु होते. प्रत्येक पालवी 'सक्षम' होताना दिसते. सक्षम... देण्यासाठी; इतरांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी! 'झाड' ही निसर्गाची एक आदभुत निर्मितीच म्हणायला हवी. रंग, आकार, गुणधर्म यांच्या प्रचंड विविधतेने नटलेल्या झाडाचा जन्मच मुळी 'देण्यासाठी' झालेला असतो. फळ, फुल, पान, सावली, सुगंध अशा विविध गोष्टी जेवढ्या आणि जशा जमतील तशा ते समोरच्याला देण्याचा प्रयत्न करतं. जणू 'देणं' हा त्याच्या  अस्तित्वाचा अविभाज्य घटकच असतो. आपल्याकडे असलेलं चांगलं समोरच्याला देऊन त्याला समाधानी आणि परिपुर्ण बनवणं हा कदाचित त्यांच्या आयुष्याचा मूळ उद्देश असावा, आणि हे साध्य करण्यासाठी त्यांचं काम अविरतपणे चालू असतं.           आपले गुरु म्हणजे असंच भरभरून दातृत्व लाभलेलं एखादं झाडच नव्हे का?  ज्ञान, कला, कल्पकता, उत्साह यांच्या विविधतेने सजलेलं एक झाड! ज्ञानाचं फळ, आत्मविश्वा