Posts

दुसरी बाजू

          कोणतीही घटना, प्रसंग असो किंवा चर्चा असो; प्रत्येकाला त्यासंबंधित 'मत' मांडण्याची अगदी तीव्र इच्छा असते. हा मानवी स्वभावाचा भाग असावा कदाचित. पण त्यामुळे "मला  काय वाटतं..." असं म्हणत प्रत्येकजण समोरची परिस्थिती ठरवायला जातो. याहीपलीकडे तेच बरोबर असल्याचंही  पटवून देत राहतो, अगदी पुराव्यांसहित. पण कित्येकदा समोरच्या घटनेला दुसरी बाजू असते... आपल्या विचारांच्या कितीतरी पलीकडची; विचार करायला लावणारी! जर्मनीमध्ये असताना एका प्रवासात मला असाच अनुभव आला.                                 प्रसंग काही मिनीटांचाच... ट्रेन मध्ये मी आणि माझ्या टीम मधील तीन जण एकत्र बसलो होतो. आमच्या गप्पा सुरु असताना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. पहिली दोन तीन मिनिटे आम्ही दुर्लक्ष केलं. पण त्यानंतरही रडणं थांबलं नसल्याने आम्ही आवाजाच्या  दिशेने पाहिलं. त्या डब्यातील मोकळ्या जागेत असलेल्या क्रेडल मधून बाळाच्या आवाज येत होता. आई तिच्या सीटवर असावी, पण आवाज ऐकून कोणीच उठताना दिसेना. आमचं असं काही सेकंदांचं निरीक्षण झाल्यावर आम्ही आमची चर्चा पुर्ववत सुरु ठेवली.                 

पेरू

          मघाशीच मी एक पेरू खाल्ला... आणि पहिल्यांदाच तो मला आवडला! हे पेरू नावाचं फळ औषधी, गुणकारी वगैरे असूनही कधीच फारसं बरं वाटलं नव्हतं. त्यात पण गंमत अशी की मला ते त्याच्या चवीमुळं नाही तर त्यातल्या भरमसाठ बिया आणि त्या खाताना होणाऱ्या त्रासामुळं आवडायचं नाही. आत्ता असं लक्षात आलं की हा पेरू नेहमीसारखाच आहे. चव पण तीच आणि बिया पण तेवढ्याच! फक्त यावेळी मी तो बियांचा त्रास न होऊ देता खाल्ला आणि तो खरोखर चांगला वाटला.           हे खाता खाता अशा बाकीच्याही गोष्टी माझ्या डोळ्यासमोरून सरकल्या... ज्यांच्या चवीशी माझं सुत जुळत असतानाही केवळ त्या खाताना त्रासदायक होतात म्हणून मी टाळत होते, त्या मला आवडत नव्हत्या. त्यात ऊस, आवळा अशा बऱ्याच गोष्टी... अगदी आंबासुद्धा!           हसू आलं ना? ते स्वाभाविकच आहे म्हणा. कारण कोणताही पदार्थ हा त्याची चव न आवडण्यामुळे किंवा तशाच कोणत्यातरी भक्कम कारणांमुळे न आवडणे एक वेळ चालू शकेल. पण फक्त खाताना त्रास होतो म्हणुन... पण खरंच हे असं केलं मी आजपर्यंत.           आता यापुढची आणखी एक मजा माहितेय का?... आपलं सगळ्यांचंच असं होतं अहो; फक्त खाण्याच्याच ब

पाकीट

          आज सकाळी बस मधून येताना माझ्याकडे दहा रुपयांचं एक नाणं होतं आणि एक नोट! मला तिकिटासाठी फक्त दहाच रुपये लागणार होते. खरंतर एवढ्या गर्दीत आपण फारसा विचार करत नाही पण तरी माझ्या डोक्यात आलंच, 'जर  हे नाणं बॅगेच्या कोणत्यातरी कोपऱ्यात जाऊन बसलं तर नंतर कदाचित सापडणारच नाही गरजेच्या वेळी; त्यामुळे आत्ता समोर दिसतंय तोपर्यंत तेच देऊन टाकू, ही नोट नंतर वापरता येईल.' या विचाराने मी ते नाणं देऊन तिकिट घेतलं. मला उगीचच त्या वेळेला हे सुचल्याचं फार छान वाटत होतं.           मी बस मधून उतरले आणि ती दहा रुपयांची नोट बॅगेत टाकण्यासाठी चेन उघडली. त्या क्षणाला त्या कप्प्यातल्या सगळ्या गोष्टी, सामान बघून असं लक्षात आलं की ही नोट इथं ठेवली तर एक दोन दिवसांतच फाटून जाईल. त्यानंतर ती आपल्याला समोर दिसत असूनही वापरता मात्र येणार नाही. तेवढ्यातच मनात आलं, अरे... आपण नोट द्यायला हवी होती. नाणं तर कितीही दिवस आपल्याकडे राहू शकलं असतं. आता मी पूर्णपणे गोंधळले होते. कारण मागच्या काही मिनिटांपूर्वी जी गोष्ट मला अगदी योग्य वाटत होती, काही वेळातच ती गोष्ट मला चुकीची वाटायला लागली होती.        

गुरू

          पावसाळा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो हिरवागार निसर्ग! चैत्रात फुटलेली पालवी बहरते आणि सगळीकडे चैतन्य पसरतं. डोंगरदऱ्या, शेत, रस्ते सगळीकडे हिरवळ दिसू लागते. झाडाझुडुपांची ऊन-पाऊस मिळवण्यासाठी चढाओढ सुरु होते. प्रत्येक पालवी 'सक्षम' होताना दिसते. सक्षम... देण्यासाठी; इतरांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी! 'झाड' ही निसर्गाची एक आदभुत निर्मितीच म्हणायला हवी. रंग, आकार, गुणधर्म यांच्या प्रचंड विविधतेने नटलेल्या झाडाचा जन्मच मुळी 'देण्यासाठी' झालेला असतो. फळ, फुल, पान, सावली, सुगंध अशा विविध गोष्टी जेवढ्या आणि जशा जमतील तशा ते समोरच्याला देण्याचा प्रयत्न करतं. जणू 'देणं' हा त्याच्या  अस्तित्वाचा अविभाज्य घटकच असतो. आपल्याकडे असलेलं चांगलं समोरच्याला देऊन त्याला समाधानी आणि परिपुर्ण बनवणं हा कदाचित त्यांच्या आयुष्याचा मूळ उद्देश असावा, आणि हे साध्य करण्यासाठी त्यांचं काम अविरतपणे चालू असतं.           आपले गुरु म्हणजे असंच भरभरून दातृत्व लाभलेलं एखादं झाडच नव्हे का?  ज्ञान, कला, कल्पकता, उत्साह यांच्या विविधतेने सजलेलं एक झाड! ज्ञानाचं फळ, आत्मविश्वा

गुलमोहर

          गुलमोहर म्हणजे निसर्गाचा एक आविष्कारच... नाही का? केशरी रंगांची त्याने केलेली उधळण पहिली की मन भरुन जातं. आणि निसर्गाच्या किमयेचं अप्रुप वाटत राहतं. त्याच्या छटांवरून नजरच हटत नाही. मार्च ते मे दरम्यान सगळीकडे झाडे वाळून जातात तेव्हा हा डौलाने बहरतो आणि इतरांची उणीव भरून काढतो. येणाऱ्या जाणाऱ्या वाटाड्यांना सावली देऊन, विसावा देऊन त्यांना आपलंसं करतो. एक प्रकारे आपल्या गरजेच्या वेळी नकळत आपला आधारच होऊन जातो. बरेच जण बऱ्याचदा गुलमोहराविषयी लिहितात, रेखाटतात... त्याच्या छटा लेखणीतून, कुंचल्यातून जगासमोर पसरतात! तरीही परत परत लिहावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं त्याविषयी; प्रत्येक वेळी तो नव्याने दिसतो आणि उमगतो देखील!            पण याच गुलमोहराकडे आज एका नव्या दृष्टीने बघायचं का आपण? जगभरामध्ये कितीतरी कला आपण पाहतो. त्यातल्याच काही आपल्यातही लपलेल्या असतात. त्या इतरवेळी कधीच दिसून येत नाहीत पण आयुष्याच्या रखरखत्या उन्हांत त्या आपल्या रंगांची उत्स्फूर्तपणे उधळण करतात व गरजेच्या वेळी आपला आधार बनतात. प्रत्येक क्षणाला 'आनंदी उद्याची' चाहूल देत आपल्या मनात आशेचे, उमेदीचे अनो

कलेक्शन

                     काही माणसं ना खुपच भन्नाट असतात. छोट्याशाच ओळखीवर ती आपली कधी वाटू लागतात लक्षातच येत नाही. बोलणं कधीतरीच होत असतं, भेटणं अगदी नाही म्हटलं तरी चालेल. पण तरीही नात्यांचा मोगरा फुलतोच ! हि माणसं आपल्या आयुष्याचा एक भाग होऊन जातात. मोगर्यासारखंच स्वच्छ, शुभ्र मन, त्याच्या सुवासासारखं दुसऱ्यासाठी वाटणारं प्रेम आपल्याला त्यांच्याकडे खेचतं. एक वेगळीच निखळता त्यांच्यात असते. त्यांच्याकडे बघून वाटतं की एवढं निर्मळ, मृदू स्वभावाचं खरंच कोणी असू शकेल?... पण असतात असे लोक आणि खूप असतात.                                                                                                                                             काहींची ओळख अगदी कामासाठी झालेली असते तर काहींची कोणासोबत तरी भेटल्याचा निमित्ताने. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ते भेटत जातात, आणि आपलं जगणंच सुंदर करून टाकतात. फक्त ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. आणि अशा लोकांचं आपलं असणं हे ही खुप एनर्जी देऊन जातं.                                  मी तर म्हणते, आपण जसं विविध गोष्टींचं कलेक्शन करतो ना तसं अशा माणसां