कलेक्शन

                     काही माणसं ना खुपच भन्नाट असतात. छोट्याशाच ओळखीवर ती आपली कधी वाटू लागतात लक्षातच येत नाही. बोलणं कधीतरीच होत असतं, भेटणं अगदी नाही म्हटलं तरी चालेल. पण तरीही नात्यांचा मोगरा फुलतोच ! हि माणसं आपल्या आयुष्याचा एक भाग होऊन जातात. मोगर्यासारखंच स्वच्छ, शुभ्र मन, त्याच्या सुवासासारखं दुसऱ्यासाठी वाटणारं प्रेम आपल्याला त्यांच्याकडे खेचतं. एक वेगळीच निखळता त्यांच्यात असते. त्यांच्याकडे बघून वाटतं की एवढं निर्मळ, मृदू स्वभावाचं खरंच कोणी असू शकेल?... पण असतात असे लोक आणि खूप असतात.                                                                                                                                             काहींची ओळख अगदी कामासाठी झालेली असते तर काहींची कोणासोबत तरी भेटल्याचा निमित्ताने. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ते भेटत जातात, आणि आपलं जगणंच सुंदर करून टाकतात. फक्त ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. आणि अशा लोकांचं आपलं असणं हे ही खुप एनर्जी देऊन जातं.                                  मी तर म्हणते, आपण जसं विविध गोष्टींचं कलेक्शन करतो ना तसं अशा माणसांचं कलेक्शन हवं आपल्याकडे. स्वभाव निराळे, वागणं-बोलणं निराळं, विचारही निराळे! पण तरीही ते आपले असतात; आपल्या कलेक्शनमध्ये असतात. त्यांना आपल्याशी बांधून ठेवणारी, नात्यांतला गोडवा टिकवणारी एकच गोष्ट असते त्यांचं निर्मळ मन! त्यांनी आपल्यावर केलेलं निस्वार्थी प्रेम!                                                                                                    खरंच जर आपण असं माणसांचं कलेक्शन केलं तर? प्रत्येकाची स्वतःची अशी वाट, आवड-निवड; तरीही ते आपल्या कलेक्शनचा एक भाग असतील. इथं एकाची जागा दुसऱ्याने न घेता ते एका मागोमाग एक वाढत जातील. या कलेक्शनमध्ये आलेली व्यक्ती नेहमीसाठीच त्या लिस्टचा भाग होऊन जाईल.                             मी पण केलंय कलेक्शन, तुमच्यासारख्या भन्नाट माणसांचं?...  तुम्ही करताय ना सुरुवात तुमची लिस्ट बनवायला?                                           

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पेरू

दुसरी बाजू