Posts

Showing posts from March, 2019

पेरू

          मघाशीच मी एक पेरू खाल्ला... आणि पहिल्यांदाच तो मला आवडला! हे पेरू नावाचं फळ औषधी, गुणकारी वगैरे असूनही कधीच फारसं बरं वाटलं नव्हतं. त्यात पण गंमत अशी की मला ते त्याच्या चवीमुळं नाही तर त्यातल्या भरमसाठ बिया आणि त्या खाताना होणाऱ्या त्रासामुळं आवडायचं नाही. आत्ता असं लक्षात आलं की हा पेरू नेहमीसारखाच आहे. चव पण तीच आणि बिया पण तेवढ्याच! फक्त यावेळी मी तो बियांचा त्रास न होऊ देता खाल्ला आणि तो खरोखर चांगला वाटला.           हे खाता खाता अशा बाकीच्याही गोष्टी माझ्या डोळ्यासमोरून सरकल्या... ज्यांच्या चवीशी माझं सुत जुळत असतानाही केवळ त्या खाताना त्रासदायक होतात म्हणून मी टाळत होते, त्या मला आवडत नव्हत्या. त्यात ऊस, आवळा अशा बऱ्याच गोष्टी... अगदी आंबासुद्धा!           हसू आलं ना? ते स्वाभाविकच आहे म्हणा. कारण कोणताही पदार्थ हा त्याची चव न आवडण्यामुळे किंवा तशाच कोणत्यातरी भक्कम कारणांमुळे न आवडणे एक वेळ चालू शकेल. पण फक्त खाताना त्रास होतो म्हणुन... पण खरंच हे असं केलं मी आजपर्यंत.           आता यापुढची आणखी एक मजा माहितेय का?... आपलं सगळ्यांचंच असं होतं अहो; फक्त खाण्याच्याच ब