Posts

Showing posts from November, 2019

दुसरी बाजू

          कोणतीही घटना, प्रसंग असो किंवा चर्चा असो; प्रत्येकाला त्यासंबंधित 'मत' मांडण्याची अगदी तीव्र इच्छा असते. हा मानवी स्वभावाचा भाग असावा कदाचित. पण त्यामुळे "मला  काय वाटतं..." असं म्हणत प्रत्येकजण समोरची परिस्थिती ठरवायला जातो. याहीपलीकडे तेच बरोबर असल्याचंही  पटवून देत राहतो, अगदी पुराव्यांसहित. पण कित्येकदा समोरच्या घटनेला दुसरी बाजू असते... आपल्या विचारांच्या कितीतरी पलीकडची; विचार करायला लावणारी! जर्मनीमध्ये असताना एका प्रवासात मला असाच अनुभव आला.                                 प्रसंग काही मिनीटांचाच... ट्रेन मध्ये मी आणि माझ्या टीम मधील तीन जण एकत्र बसलो होतो. आमच्या गप्पा सुरु असताना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. पहिली दोन तीन मिनिटे आम्ही दुर्लक्ष केलं. पण त्यानंतरही रडणं थांबलं नसल्याने आम्ही आवाजाच्या  दिशेने पाहिलं. त्या डब्यातील मोकळ्या जागेत असलेल्या क्रेडल मधून बाळाच्या आवाज येत होता. आई तिच्या सीटवर असावी, पण आवाज ऐकून कोणीच उठताना दिसेना. आमचं असं काही सेकंदांचं निरीक्षण झाल्यावर आम्ही आमची चर्चा पुर्ववत सुरु ठेवली.